मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची आज महत्वपूर्ण बैठक !

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची आज महत्वपूर्ण बैठक !

उस्मानाबाद – मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची बैठक आज तुळजापूरमध्ये सुरू होत आहे. यासाठी क्रांती मोर्चाचे समन्वयक संपूर्ण राज्यभरातून तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभर ५७ मुकमोर्चे काढल्यानंतरही शासनाला जाग आली नाही. मोर्चाकडे दुर्लक्ष करीत शासनाने मराठा समाजाच्या प्रश्नावर तात्पुरती मलपट्टी लावण्याचा प्रयत्न केला. शासनाला केवळ मुकमोर्चातून योग्य दिशा समजत नसावी. मराठा समाजाचे प्रश्न आणि आरक्षण यावर चर्चा करून क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत शासन उदासीन आहे. मोर्चानंतर शासनाने विविध घोषणा केल्या. पण, प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान इतर फाटे फोडण्याच्या ऐवजी क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील समन्वयकांनी मोर्चाच्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात येत्या २९ तारखेला होत असून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक होत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

COMMENTS