घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांचा खासदार संभाजीराजेंना घेराव !

घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांचा खासदार संभाजीराजेंना घेराव !

पुणे – आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनाी खासदार संभाजीराजे भोसले यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. जागे व्हा, जागे व्हा, संभाजीराजे जागे व्हा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्या संभाजी राजेंसमोर दिल्या. यावर संभाजीराजेंनेही आंदोलकांना उत्तर देत शांत केले. खासदार संभाजीराजे भोसले हे शनिवारी पुण्यात पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. या कार्यक्रमाला जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना गाठले. आंदोलकांनी संभाजीराजेंना घेराव घालत घोषणाबाजी केली.

दरम्यान या आंदोलकांना संभाजीरांनी उत्तर दिलं असून ‘मराठा समाजाला जागे ठेवण्याचे काम आज नव्हे तर २००७ पासून करतोय. हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. मी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडल्यावर अन्य खासदारही लोकसभेत मराठा समाजाची बाजू मांडू लागले आहेत. ही लढाई यशस्वी व्हावी, यासाठी आपण सर्वच प्रयत्न करत आहोत. पण शांत, संयमी पद्धतीने आंदोलन करा असं आवाहनही यावेळी संभाजीराजेंनी केलं आहे.

 

COMMENTS