अशोक चव्हाणांना पदमुक्त करुन एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी द्या, मराठा समन्वय समितीचं अजित पवारांकडे निवेदन!

अशोक चव्हाणांना पदमुक्त करुन एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी द्या, मराठा समन्वय समितीचं अजित पवारांकडे निवेदन!

मुंबई –  मराठा समन्वय समिती आणि शिवसंग्रामच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे. यामध्ये  मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष  अशोक चव्हाण यांना या समितीवरून पदमुक्त करुन एकनाथ शिंदे यांना त्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाचे आरक्षण व समाजाचे विविध महत्त्वाचे प्रश्न जसे की सारथी असेल किंवा आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना नोकरी आणि पैशांची मदत मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच मराठा आरक्षणा करता ज्यांनी अंगावर गुन्हे घेतले त्यांच्याबाबत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला  सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवून काम सुरु करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात जे समाजाचे प्रश्न आहेत त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

COMMENTS