धनंजय मुंडेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

धनंजय मुंडेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने सोशल मिडियावर पोस्ट करीत बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे राज्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, आज खुद्द धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करीत असताना मोठा गौप्यस्फोट केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांनी बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने माझ्याविरुद्ध केलेले सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या.

COMMENTS