“आपल्या जिवाला धोका”, दोन मंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी!

“आपल्या जिवाला धोका”, दोन मंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी!

मुंबई – महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं आहे. दाभोळकर, पानसरे यांची हत्या झाल्यानंतर धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत-पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर मागील वर्षी आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केलं होतं. परंतु जानेवारी 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणुकीच्या कारणामुळेे जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. त्यानंतर आता आव्हाड यांनी आपली सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.

COMMENTS