गेली अनेक दिवसांपासून ‘हेच’ सांगतायत, आमदार राहुल मोटेंची मुख्यमंत्र्यांवर टीका ! VIDEO

गेली अनेक दिवसांपासून ‘हेच’ सांगतायत, आमदार राहुल मोटेंची मुख्यमंत्र्यांवर टीका ! VIDEO

उस्मानाबाद – मुख्यमंत्र्यकडून आढावा बैठकीत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आमदार राहुल मोटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी उपयोजना करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचेही त्यांनी म्हटले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी निधी देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीकाही मोटे यांनी केली. किमान 500 कोटी दिले तरी कामे होतील. आतापर्यंत केवळ 23 कोटी मिळाले आहेत. दरम्यान नाबार्डकडे 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेले अनेक दिवस हेच सांगत आहेत. प्रत्यक्षात काहीच मिळत नसल्याने मोटे यांनी नाराजी व्यक्त केली.

COMMENTS