पक्ष वाढीसाठी मनसेचे मेगा प्रोजेक्शन

पक्ष वाढीसाठी मनसेचे मेगा प्रोजेक्शन

मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीत मनसेचा विस्तार करण्यासाठी मेगो प्रोजेक्शन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणूनमनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच मराठी भाषा दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते.

नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देतील. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

9 मार्चच्या पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे संबोधन करतात. यंदा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत आपण मनसे सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल. गटाध्यक्षांना नव नाव राजदूत देण्यात येणार त्यांना बिल्ला देण्यात येईल. राजकारणापलीकडच्या सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात, त्यांच्या कल्पनांचा शहरांच्या विकासासाठी स्वत:हून काम करणाऱ्या लोकांना राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं जाईल, असं नांदगावकर म्हणाले.

COMMENTS