निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा महत्वपूर्ण मेळावा, “हे” होऊ शकतात निर्णय !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा महत्वपूर्ण मेळावा, “हे” होऊ शकतात निर्णय !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या मेळाव्याला आज राज ठाकरे संबोधित करणार आहे. मनसेच्या पदाधिका-यांचा आणि इच्छुकांचा हा मेळावा आहे. या मेळाव्यात राज ठाकरे हे निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच किती जागांवर उमेदवार उभे करायचे प्रचाराचे मुद्दे कोणते ठेवायचे याबाबबतही मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडं संपूर्ण महाराष्टाचं लक्ष लागलं आहे.

या मेळाव्यात राज ठाकरे हे काही उमेदवारांचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यामुळे पक्ष निवडणूक लढवणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे राज यांना निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असंही बोललं जातंय. युती झाली तर भाजप शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. युतीचे काही तगडे बंडखोर हाती लागले तर तेही गळाला लावण्याची मनसेची रणनिती असल्याचंही बोललं जातंय.

COMMENTS