शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय?

शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यासोबतच्या चर्चेनंतर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळत आहेत. लोकसभा लढण्यास मनसे इच्छुक नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत मनसेला रस असून सत्ताधारी पक्षाविरोधात लढणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा सुरु होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. परंतु या प्रस्तावालाही काँग्रेसने नकार दिला होता. त्यानंतर आता लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसेनं घेतला असल्याची चर्चा आहे.

COMMENTS