संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून, ‘हे’ मुद्दे गाजणार !

संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून, ‘हे’ मुद्दे गाजणार !

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून १८ जुलै ते १० आँगस्ट या तीन आठवड्यांच्या काळात हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनादरम्यान तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का याचीही उत्सुकता लागली असून राज्यसभेच्या उपसभापती निवडीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संसदीय कामकाजासंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान या अधिवेशनात काही महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करुन ते मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष देखील पूर्ण तयारीने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन चांगलच जाणार असल्याचं दिसत आहे.  तसेच ओबीसींच्या राष्ट्रीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारे विधेयक तसेच तिहेरी तलाक विधेयक यांसारख्या महत्वपूर्ण विधेयकांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS