18 डिसेंबरला ‘ही’ घोषणा करणारअमोल कोल्हेंच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण!

18 डिसेंबरला ‘ही’ घोषणा करणारअमोल कोल्हेंच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण!

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कोल्हो यांनी येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याचे फेसबुकवर म्हटलं आहे. या पोस्टमध्ये कोल्हे यांनी भगवा रंग दिला आहे. “A Big Announcement……On 18 th December!!!” असा मजकूर त्यांनी यावर लिहिला आहे. त्यामुळे 18 डिलेंबरला खासदार कोल्हे हे नेमकी कोणती घोषणा करणार आहेत. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला पराभूत केले. विधानसभा निवडणुकीतही ते राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी एक्का ठरले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभा गाजल्या. त्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता येत्या 18 डिसेंबरला अमोल कोल्हे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. खासदार कोल्हे कोणती घोषणा पकरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असाही अंदाज काहींनी मांडला आहे. विशेष म्हणजे काहींनी 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे. परंतु 18 डिसेंबर रोजीचं हे स्पष्ट होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS