“2019 मध्ये काँग्रेसची सत्ता येईल अशी त्यानं फेसबूकवर पोस्ट टाकली आणि त्याची हत्या झाली”

“2019 मध्ये काँग्रेसची सत्ता येईल अशी त्यानं फेसबूकवर पोस्ट टाकली आणि त्याची हत्या झाली”

मुंबई – काँग्रेसची 2019 मध्ये सत्ता येईल अशी पोस्ट टाकणं मुंबईतील एका काँग्रेस कार्यकर्त्याला महागात पडलंय. अशी पोस्ट टाकल्यामुळे भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर तलवारीचे वार करुन हत्या केली आहे. मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात ही घटना घडली. मनोज दुबे असं हत्या झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

रात्री दीड ते दोनच्या दरम्यान घाटकोपरच्या साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान भाजपच्या स्थानिक आमदाराबाबत टीका करणारी पोस्ट काँग्रेसच्या मनोज दुबे नावाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर टाकली होती. या पोस्टवरून फेसबुकवरच भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाचीही झाली होती. याचा राग ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुबे यांना असल्फा मेट्रो स्थानकाजवळ गाठले आणि वादावादी केली. यावेळी दुबे यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये दुबे यांचा मृत्यू झाला. अशीही चर्चा आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS