मुंबई – दहिसरमध्ये शिवसेना मतदारसंघाबाहेरचा उमेदवार देणार ?

मुंबई – दहिसरमध्ये शिवसेना मतदारसंघाबाहेरचा उमेदवार देणार ?

मुंबई – शिवसेनेने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात उमेदवारासाठी चाचपणी केली जात आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने घुसखोरी केल्याचं शल्य शिवसेनेला आहे. त्याचं उट्ट काढण्यासाठी शिवसेनेकडून मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्यावेळी दहिसर या हकक्काच्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने जिकंला होता. मोदी आणि भाजपची लाट जशी शिवसेनेच्या पराभवला कारणीभूत होती तशी शिवसेनेतील गटतट आणि मतभेद यामुळे दहिसरसारख्या मराठीबहुल मतदारसंघात पक्षाला पराभव पत्कारावा लागला होता.

2014 मध्ये शिवसेनेने तत्कालीन विभागप्रमुख आणि तत्कालीन आमदार विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. घोसाळकर आणि माजी महापौर शुभा राऊळ, नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. तो वाद एवढा पराकोटीला गेला होता की शेवटी पक्षश्रेष्ठींना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. वाद मिटला नाही आणि घोसाळकरांना पराभव स्विकारावा लागला. तो वाद अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी दुसरा गट त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करणार यात शंका नाही.

दहीसर हा मतदारसंघ तसा पाहिला गेला तर शिवसेनेसाठी सोईचा आहे. मात्र मतदारसंघातील इच्छुकांच्या वादामुळे पुन्हा एकदा तो भाजप हिसकावून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी सध्याच्या इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवार न देता मतदारसंघाबाहेरचा उमेदवा द्यावा असं साकडं मातोश्रीला घातल्याचं बोललं जातंय. बाहेरचा उमेदवार दिला तर सर्व गट वाद न घातला पक्षाचं काम करतील अशी शिवसैनिकांदी धारणा आहे. आणि गेल्यावेळेच्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी पक्षाला मिळेल असंही त्यांना वाटतंय. शिवसैनिकांच्या शिफारशीचा मातोश्रीवरही गांभीर्याने विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळेच दहिसरामध्ये शिवसेनेचा मतादरसंघाबाहेरचा उमेदवार असेल अशी शक्यता आहे.

COMMENTS