मुंबईत कोरोनाचा पहिला बळी, शासकीय कार्यालयेही बंद ठेवणार?

मुंबईत कोरोनाचा पहिला बळी, शासकीय कार्यालयेही बंद ठेवणार?

मुंबई – कोरोनामुळे मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असू दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. गेली पाच दिवसांपासून या रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती, अशी माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे या मृत रुग्णाच्या पत्नी आणि मुलगाही कोरना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार महाराष्ट्रात दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. शहरांमधल्या शाळा, महाविद्यालयं आणि सार्वजनिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालये देखील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शासकीय अत्यावश्यक सेवा सोडून इतर कार्यालय बंद करता येतील का, यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची आहे.

तसेच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या उपाययोजनांसाठी निधीची गरज असून, सरकारनं कंपन्यांकडं धाव घेतली आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

COMMENTS