पीक विम्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचा मोर्चा,  उद्धव ठाकरेंसह अनेक शिवसैनिकांचा सहभाग!

पीक विम्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचा मोर्चा, उद्धव ठाकरेंसह अनेक शिवसैनिकांचा सहभाग!

मुंबई – पीक विम्या कंपन्यांविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येत आहे. विमा कंपन्या जाणून-बुजून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.परंतु सत्तेत असूनही कंपन्यांवर दबाव न आणता रस्त्यावर मोर्चा काढून शिवसेनेला नेमकं काय दाखवायचं
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री मोर्चात सहभागी झाले.

दरम्यान शेतकरी कर्जमाफी हा विषय जुना आहे, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ चांगली असली, तरी ही योजना, यंत्रणा तळगाळात पोहचत नाही. सरकार जरी बदललं असलं, तरी यंत्रणा तीच आहे. आजही काही प्रकरणं बाकी आहेत, लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हा इशारा मोर्चा काढण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

COMMENTS