भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत महाविकास आघाडीचा विजय !

भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत महाविकास आघाडीचा विजय !

नाशिक – नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधूकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 22 मधून महाआघाडीचे उमेदवार जगदीश पवार 3388 मतांनी विजयी झाले आहेत.
शिवसेनेच्या मधुकर जाधव यांना 5865 मतं मिळाली तर मनसेच्या दिलीप दातीर यांना 3053 मतं मिळाली. तसेच भाजपाच्या विशाखा शिरसाठ यांना १५२५ मते मिळाली. कैलास अहिरे यांना 1021 मतं मिळाली आहेत. यामुळे पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे.

जगदीश पवार

दरम्यान सिडको विभागात प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे मधूकर जाधव हे देखील २ हजार ८१२ मतांच्या दणदणीत आघाडीने विजयी झाले आहेत. या जाधव यांना ५ हजार ८६५ मते मिळाली तर मनसेचे दिलीप दातीर यांना ३०५३ मते मिळाली आहेत.

नाशिकरोड विभागातून भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडन लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर सिडको मधून देखील शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नाशिकरोडच्या सरोज आहिरे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणल्याने महापालिकेत भाजपाची एक जागा घटली आहे तर दुसरीकडे मधूकर जाधव निवडून आल्याने शिवसेनेने जागा राखली आहे.

COMMENTS