नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात !

नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात !

नागपूर – राज्य आणि केंद्र सरकारविरोधात काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढली आहे. नागपूर विभागातील या यात्रेला सुरुवात झाली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह या यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव  ठाकरे, विलासराव मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक सहभागी झाले आहेत.

यात्रेचा हा पाचवा टप्पा असून दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा शुभारंभ झाला आहे. या यात्रेची रामटेक येथे पहिली सभा पार पडणार असून त्यानंतर तुमसर आणि तिरोडा येथे जाहीर सभा होणार आहेत. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस नेत्यांनी केलं आहे.

COMMENTS