राष्ट्रवादीला धक्का, नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश ! VIDEO

राष्ट्रवादीला धक्का, नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश ! VIDEO

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून केजमधून उमेदवारी देण्यात आलेल्या नमिता मुंदडा यांनी संपूर्ण कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे नमिता मुंदडा यांनी अक्षय मुंदडा,नंदकिशोर मुंदडा यांच्यासह शेकडो समर्थकांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंदडा या आगामी विधानसभा निवडणूक केज मतदारसंघातून भाजपमधून लढवणार आहेत.
केज मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. परंतु अखेर भाजपनं नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचा दौरा केला होता. बीड जिल्ह्यात गेले असता पवारांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतुन विजयसिंह पंडित आणि केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु आता नमिता मुंदडा यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला आहे.

COMMENTS