आमदार नितेश राणे ‘या’ पक्षातून लढणार, नारायण राणेंचा दावा!

आमदार नितेश राणे ‘या’ पक्षातून लढणार, नारायण राणेंचा दावा!

कणकवली – काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपमधून लढवतील असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नितेश राणे यांनाच मिळेल असं राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी राणे कणकवलीत आले होते. यावेळी कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोर राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर बोलत असताना त्यांनी आपली आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नितेश राणे यांनाच मिळेल असं राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS