सामनाचे संपादक तोंडावर पडले, नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका!

सामनाचे संपादक तोंडावर पडले, नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका!

मुंबई – सामनाचे संपादक तोंडावर पडले असल्याची टीका भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर नाव न घेता केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. या प्रकरणानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांनी आत्मपरीक्षण करावं,अशाप्रकारचा हा निर्णय आहे. जगात मुंबई पोलिसांचे नाव आहे. ते असताना कोणाच्या तरी सांगण्यावरुन किंवा मदत करण्याच्या हेतूने हे जे काम चालू होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा असंही राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हा भारतीय जनतेच्या मनातील निर्णय आहे. लोकांना ही केस सीबीआयकडे जावी हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच सुशांतवर, त्याच्या कुटुंबियांवर जो अन्याय होतो आहे. कायद्याचा वापर न करता कायद्याविरोधात कोणाला तरी मदत केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय झालेला आहे,
यामुळे सामनाचे संपादक तोंडावर पडले आहेत. त्यांनी केस सीबीआयकडे जाण्याचं काम सोप केलं आहे. आता मुंबई, हिंदुत्व, मराठी माणूस असे विषय ते काढणारच असंही राणेंनी म्हटलं आहे.

COMMENTS