पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरही चित्रपट, हा अभिनेता साकारणार मोदींची भूमिका!

पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरही चित्रपट, हा अभिनेता साकारणार मोदींची भूमिका!

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे. विवेकसोबतच ज्येष्ठ अभिनेते परेश रावलही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.

दरम्यान  नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या महिन्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

COMMENTS