नरेंद्र मोदी आज घेणार पंतप्रधानपदाची शपथ,   शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला मंत्रिपदाची लॉटरी!

नरेंद्र मोदी आज घेणार पंतप्रधानपदाची शपथ, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला मंत्रिपदाची लॉटरी!

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. मोदी यांच्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नवीन चेह-यांनाही संधी देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. त्यामुळे सावंत हे आपल्या कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या या सोहळ्याकडे देशाचं
लक्ष लागलं आहे.

COMMENTS