विधानसभा उपाध्यक्षांचा झिंगाट डान्स ! Video

विधानसभा उपाध्यक्षांचा झिंगाट डान्स ! Video

दिंडोरी – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आपल्या मुलाच्या लग्नातील नृत्य चांगलेच व्हायरल होत आहे. नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नासाठी कोणत्याही नेत्यांना व जनतेला प्रत्यक्ष लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसोहळा ऑनलाईन करत सर्वांना शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. यावेळी आदिवासी तारपा संगीतावर ताल धरत झिरवाळ यांनी साधेपणाने आपल्या मुलाचा विवाह पार पाडला. झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ यांच्या हळदी समारंभाला कुटुंबीयांसमवेत ठेका धरला. वनारे येथील निवासस्थानी त्यांनी पत्नी व नाती समवेत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

COMMENTS