गिरीश महाजन, अजित पवार वाद चिघळला !

गिरीश महाजन, अजित पवार वाद चिघळला !

नाशिक – भाजपनं बॅनरद्वारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये अजित पवार यांच्याविरोधात बॅनर लावले आहेत. ‘मुतऱ्या तोंडाचा अजित….’ अशा आशयाचे बॅनर्स नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी लावले आहेत. तसेच या बॅनरद्वारे अजित पवारांना देशद्रोही म्हणत त्यांनी एकेरी शब्दात उल्लेख केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी महाजनांवर आक्षेपार्ह विधान केले होते. अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना ‘नाच्या’ असं संबोधलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आपला राग व्यक्त केला आहे. तसेच या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत आता चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS