शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपचा ‘मनसे’सोबत घरोबा !

शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपचा ‘मनसे’सोबत घरोबा !

मुंबई – शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपनं आता मनसेसोबत घरोबा केला असून नाशिकमध्ये भाजप-मनसे नवे समीकरण पहायला मिळत आहे. मनसेसोबत असल्याचा भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी दावा केला आहे. काल मनसे कार्यालयात भाजप आणी मनसे नेत्यांत बैठक झाली होकी. त्यानंतर आज भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी मनसे भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत महाशिवआघाडीसोबत मनसे नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान महापौरपदासाठी भिकुबाई बागुल, दिनकर आढाव, सतीश कुलकर्णी आणि शशिकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी अल्का आहेर, गणेश गीते, अरुण पवार आणि भिकुबाई बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS