नाशिकमधील आगामी निवडणुकीचे शिवसेनेने फुंकले रणशिंग, महाबळेश्वरच्या थंडगार वातावरणात ठरली रणनिती !

नाशिकमधील आगामी निवडणुकीचे शिवसेनेने फुंकले रणशिंग, महाबळेश्वरच्या थंडगार वातावरणात ठरली रणनिती !

महाबळेश्वर – नाशिक जिल्ह्यातील आगामी विधान परिषद निवडणूक, त्यानंतरची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवेसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक थेट महाबळेश्वरला घेण्यात आली. नाशिक लोकसभा मतदार संघातील नाशिक महानगरपालिका, इगतपुरी, सिन्नर, भगूर व त्रंबकेश्वर नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाबळेश्वर येथे करण्यात आले होते. या शिबिरात आगामी नाशिक लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणुका संदर्भात  नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. आगामी विधान पररिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठीही ही काळजी घेण्यात आली.

शिबिराचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय आहारतज्ञ नितीन दढे यांच्या हसत खेळत जपा स्वताचे आरोग्य या विषयाने करण्यात आले, नगरसेवकांच्या रोजच्या व्यस्त दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्याची कासळजी कश्याप्रकारे घेतली पाहिजे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर समीर देव यांनी प्रभावी जनसंपर्क व संघटन या विषयावर शास्त्रशुद्ध पध्दतीने मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंदाज पत्रकातील विविध बाबी या विषयावर माजी अप्पर आयुक्त आदिवासी विकास भवन तथा नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या समारोपाला सभागृहातील कामकाज व आयुधे या विषयावर मुंबई शिवसेनेच्या सौ. किशोरी पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले, आपल्या मार्गदर्शनात किशोरीताई पेडणेकर यांनी स्वताचे मुंबई महापालिकेतील स्वताचे सभागृहातील कामकाज व अनुभव गंमतीदार रित्या सांगितले. नाशिकच्या आगामी लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणुकासाठी शिवसेनेचा  जोपण उमेदवार असेल तो  निवडून आणण्यासाठी नाशिक शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्रितरित्या कामकाज करून निवडून आणतील त्यासाठी निवडणुकीची आव्हाने व तयारी संदर्भात संपर्कप्रमुख आमदार अजयजी चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख तथा विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू आण्णा लवटे, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, भागूरच्या नगराध्यक्षा अनिताताई करंजकर, सभापती सुदाम ढेमसे, सत्यभामाताई गाडेकर, प्रविण तिदामे, सूर्यकांत लवटे, डी जी सूर्यवंशी, आर डी धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुधाकर बडगुजर, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, भागवत आरोटे, दिलीप दातीर, केशव पोरजे, दिपक दातीर, सुनील गोडसे, मंगलाताई आढाव, कल्पनाताई पांडे, हर्षाताई बडगुजर, पूनमताई मोगरे, नयनाताई गांगुर्डे, राधाताई बेडकुळे, हर्षादाताई गायकर, कल्पनाताई चुंभळे, ज्योतीताई ख्रजुल, सीमा ताई निगळ, सुवर्णाताई मटाले, सुनीताताई कोठुळे, ज्योती ताई खोले, संगीताताई जाधव, शामलाताई दिक्षित तसेच इगतपुरी, सिन्नर, भगूर व त्रंबकेश्वरचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

COMMENTS