नाशिक – पंधरा हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक !

नाशिक – पंधरा हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक !

नाशिक – पंधरा हजारांची लाच घेताना येवला तालुक्यातील नागडे ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली असून जनार्दन कचरू वाघ असे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे. सैनिक स्कुलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अनेक नागरिक तहसिल कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी या नागरिकांना रहिवासी दाखला ,जातप्रमाणपत्र व डोमेसाईल प्रमाणपत्र त्वरित काढून देण्यासाठी जनार्दन कचरू वाघ या ग्रामसेवकानं 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. यावरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS