माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना झटका !

माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना झटका !

नवी मुंबई – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना न्यायालयानं झटका दिला आहे. एमआयडीसीमध्ये असणा-या बावखळेश्वर मंदीर तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या बावखळेश्वर ट्रस्टला अपयश आलं असून बावखळेश्वर मंदिरावर आता हातोडा पडणार आहे.

दरम्यान यापूर्वीच हायकोर्टानं हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता. परंतु त्याविरोधात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात बावखळेश्वर ट्रस्टने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. परंतु सुप्रिम कोर्टाच्या तीन समित्यांनी याबाबत तपास केला होता. या तपासातील समितीनं या मंदिराला अवैध ठरवलं आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टानं हे मंदिर पाडण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या या आदेशामुळे एमआयडीसीला कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

COMMENTS