राष्ट्रवादीतून गेलेले आमदार शरद पवार आणि अजित पवारांना भेटून गेलेत – नवाब मलिक

राष्ट्रवादीतून गेलेले आमदार शरद पवार आणि अजित पवारांना भेटून गेलेत – नवाब मलिक

मुंबई – सत्तेच्या लालसेने राष्ट्रवादीतून गेलेले आमदार स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त करतायत.
यातील काही जण शरद पवार आणि अजित पवारांना भेटून गेलेत. पण याबाबत निर्णय झालेला नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राज्यात 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असा प्रचार भाजपाने केला.सुधारित प्रशासकीय मान्यता हाच भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.एसीबीने अजित पवारांचा कोणताच सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिलं आहे. याबाबत न्यायालयात काय व्हायचं ते होईल. आम्ही जे सात वर्ष बोलत होतो यात कुठलाही घोटाळा नाही, ते आता सिद्ध होतय असं मलिक यांनी म्हटलं आहे..

तसेच भाजपाचा खोटा प्रचार उघडा पडला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता हा भ्रष्टाचार होत नाही. मागच्या सरकारने एकाच वर्षात 35 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. कोळसा घोटाळा, टू जी घोटाळा असे अनेक खोटे आरोप भाजपाने केले असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उन्नाव प्रकरणातील पीडित मुलीचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल आलाय. पीडित मुलगी 95 टक्के भाजली होती, तरी असा अहवाल का दिला ?, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका निर्माण होत असल्याचंही यावेळी मलिक म्हणाले आहेत.

COMMENTS