“घरका भेदी लंका ढाये”,भाजपच्या बंडखोर उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी! VIDEO

“घरका भेदी लंका ढाये”,भाजपच्या बंडखोर उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी! VIDEO

नाशिक – भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी बंडखोरी केली आहे. सानप यांना राष्ट्रावादीनं उमेदवारी दिली आहे. सानप यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. परंतु सानप यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर फ़लक लावण्यात आले असून
गद्दारांना पार्टीत प्रवेश दिला म्हणत राष्ट्रावदीतील एक गट नाराज आहे. घरका भेदी लंका ढाये असा फलकावर आशय लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि आमदारांविरोधात ही फलकबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सानप यांच्यासोबत मोठ्या कार्यकर्त्यांचा ताफा होता. नाशिक पूर्वमधील अनेक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे नाशिकचे नेतेही सानप यांच्या कळपात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होते.

सानप यांच्या निर्णयामुळे नाशिक पूर्वमध्ये तिहेरी लढत होणार आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीकडून बाळासाहेब सानप अशी लढत होणार आहे.

COMMENTS