राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन!

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन!

पिंपरी – राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर वाढतच आहे. कोरोनामुळे राज्यातील काही नेत्यांचं निधन झाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचंही कोरोनामुळे आज निधन झालं आहे. चिंचवडमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्ता साने यांना २५ जूनला कोरोनाची लागण झाली होती.त्यांना कोरोनासोबत न्युमोनियाचीदेखील लागण झाली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. आज अखेर त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

दत्ता साने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली प्रभागातून ते तीनवेळा निवडून आले होते.
दत्ता साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं होतं.लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरजूंना मोठी मदत केली होती. मोफत धान्य वाटपाचं काम त्यांनी केलं होतं.

दरम्यान, दत्ता साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ता यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तस्च राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दत्ता साने यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी देखील दत्चा साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धक्कादायक. माझे सहकारी-मित्र-मार्गदर्शक दत्ताकाका साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट लांडगे यांनी केली आहे.

धक्कादायक.. माझे सहकारी-मित्र-मार्गदर्शक दत्ताकाका साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

Posted by Mahesh Kisan Landge on Friday, July 3, 2020

COMMENTS