पालकमंत्र्यांनी विकासात राजकारण करण्याचे पाप केले- धनंजय मुंडे

पालकमंत्र्यांनी विकासात राजकारण करण्याचे पाप केले- धनंजय मुंडे

परळी – बीड भाजपाच्या पालकमंत्री आणि खासदार यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना विकास तर करता आला नाही, विकास कामात खोडा घालण्याचे पाप मात्र केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तर सालगडी निवडण्यात बीड जिल्ह्याची मागील वेळी चुक झाली आहे, ती चुक पुन्हा करू नका असे आवाहन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस टि.पी.मुंडे यांनी केले.

बीड लोसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या नेत्यांचा संयुक्त दौरा परळीत तालुक्यात सुरू आहे, या दौर्‍यास मोठा प्रतिसाद मिळत असून, सोमवारी रात्री तळेगाव येथे झालेल्या जाहीर सभेस ते बोलत होते. प्रस्ताविक करताना मार्केट कमिटीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे यांनी तळेगावातील सभा मंडपाला एक रूपया न देता भाजपच्या पालकमंत्र्यांनी खोटे भूमिपुजन केले, धनंजय मुंडेंनी शिफारस केली म्हणुन पाणी पुरवठा योजनेला खोडा घातला, असा आरोप केला. याचा संदर्भ घेत बोलताना धनंजय मुंडे यांनी तळेगावात एक रूपयाही दिला नाही, तर भूमिपुजन कशाचे केले ? आम्ही मंजुर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी खोडा घातला संपुर्ण तालुक्यात आणि मतदार संघात असाच प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. विकासाच्या नावावर जिल्हा बकास करणार्‍यांची या निवडणुकीत माती करा, असे आवाहन प्रा.टि.पी.मुंडे यांनी केले. कठीण काळात तळेगावाने आपल्यावर कायम प्रेम केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी गावकर्‍यांचे आभार मांडले.

यावेळी जि.प.सदस्य बबन दादा फड, प्रदिप मुंडे, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, उपसभापती विजय मुंडे, सुर्यकांत मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, प्रा.बी.डी.मुंडे, पं.स.उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, पं.स.सदस्य माऊली मुंडे, बळीराम आघाव, माणिक मुंडे, आप्पासाहेब मुंडे, दशरथ मुंडे, कारभारी मुंडे, राहुल कांदे, राजाभाऊ फड, विष्णु मुंडे, नारायण पारवे, गणेश मुंडे, जयदत्त नरवटे आदी उपस्थित होते.

COMMENTS