गुजरातमधील लोकसभा निडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीची मोठी घोषणा!

गुजरातमधील लोकसभा निडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीची मोठी घोषणा!

मुंबई – गुजरातमधील लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मोठी घोषणा केली आहे. गुजरातमधील फक्त एकच जागा लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतला आहे. पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून विरेंद्र पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पटेल हे एकटेच गुजरातमधून राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील सर्व  म्हणजेच 26 जागा लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली होती. परंतु आता राष्ट्रवादीने माघार घेतली असून गुजरातमध्ये आम्ही फक्त एकाच जागेवर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 26 जागांपैकी 25 जागांवरून राष्ट्रवादीने सपशेल माघार घेतली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS