छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, सांगितला मजेदार किस्सा !

छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, सांगितला मजेदार किस्सा !

मुंबई – मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं राज्यातील पदाधिका-यांसाठी शिबिराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भुजबळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आपल्या राजकीय जीवनातील काही अनुभवही यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. लोकांसाठी झोकून कसे द्यायचे असते यासंदर्भात भुबळ यांनी एक किस्सा सांगितला. नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आलो. भायखळ्यातील ई वॉर्ड मधून निवडून आलो होतो. तिथे एक मातीचा ढिगारा होता. तो स्वच्छ करण्यासाठी वारंवार महापालिकेकडे पत्र व्यवहार केला. परंतु मातीचा ढिगारा तसाच होता. शेवटी दोन महिने वाट पाहून सगळी माती टेंपोत भरली तो टेंपो महापालिकेजवळ घेऊन गेलो आणि महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरच्या टेबलवर घमेले भरून माती टाकली. वॉर्ड ऑफिसर म्हणू लागले हे काय करता? तर मी त्यांना उत्तर दिले की मातीचा ढिगारा स्वच्छ करा म्हणून दोन महिने पत्रव्यवहार करतो आहे. मात्र तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तो ढिगाराच इथे आणूण टाकला. त्यानंतर ई वॉर्ड स्वच्छ कसा झाला आणि लोकांनी माझा जयजयकार कसा केला हेदेखील भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान दर वेळी कायदा हातात घेतला पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवण्याचा सल्लाही यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी भुजबळ यांनी एक शेरही सादर केला. हिंमत हरू नका म्हणत भुजबळ म्हणत, ”कश्ती तो उनकी डुबती हैं, जिनके इमान डगमगाते हैं, जिनके दिलमें नेकी होती है, उनके आगे मंजिलेभी सर झुकाती है” आंदोलन करण्याच्या आधी डगमगून जाऊ नका. तुरुंगात गेलो तर सोडवतील कसे याची चिंता बाळगू नका लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडा तर लोक तुम्हाला साथ देतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. मुंबईत अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकांना सहकार्य करा असेही आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली. हे सरकार आरक्षण संपवायच्या तयारीत असून आरक्षण संपवणे हा सरकारचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं. हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहन यावेळी भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केलं.

 

COMMENTS