नारायण राणेंच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश!

नारायण राणेंच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश!

मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यानं आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपमध्ये पिरवेश केला आहे. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गमधील स्थानिक नेते आहेत.
ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ निवासस्थानी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. गुलाबराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS