राष्ट्रवादीच्या समीर देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

राष्ट्रवादीच्या समीर देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का बसला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. समीर देशमुख हे सहकार महर्षी आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मुलानच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी समीर देशमुख यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहेे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते देवळी मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येत असल्यामुळे देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

COMMENTS