राष्ट्रवादी कॉग्रेस वर कळंब च्या राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष मुंदडा यांचा अविश्वास;

राष्ट्रवादी कॉग्रेस वर कळंब च्या राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष मुंदडा यांचा अविश्वास;

कळंब- नगर परिषद निवडणुकीच्या काळात को-या कागदावर सह्या झालेल्या असुन याचा वापर राजीनाम्या करीता होणार असल्याची शक्यता राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात वर्तावली असून या माध्यमातून मुंदडा यांना अप्रत्यक्ष रित्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कळंब नगर परिषद येथे राष्ट्रवादीच्या हाती एक हाती सत्ता देण्यात आलेली आहे. नगराध्यक्षा म्हणून सुवर्णा सागर मुंडे या झालेल्या आहेत. तर उपनगराध्यक्ष म्हणून संजय मुंदडा यांची वर्णी लागली होती. उपनगराध्यक्ष निवड करताना १८ महिने उपनगराध्यक्ष बनवण्याचा अलिखीत करार करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी मुंदडा यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचालीला वेग आला आहे. मात्र मुंदडा हे राजीनामा देण्यास दिरंगाई करत असल्यामुळे राष्ट्रवादी मध्ये चांगलीच गटबाजी उफाळून आली आहे. दिनांक ६ ऑगस्ट रोजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी नगराध्यक्षा यांना एक निवेदन दिले असुन या माध्यमातून राष्ट्रवादी विषयी शंका व्यक्त करुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरित्या आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर आमदार पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे नेमके निवेदन……..
मी संजय पांडूरंगजी मुंदडा उपाध्यक्ष
नगर परिषद कळंब या पदावर कार्यरत असून माझ्या निवडणूकीच्या दरम्यान मी खर्च सदर करताना केलेल्या काही कागदपत्रावरील सहया पैकी अनावधानाने कोन्या कागदावर सहया झालेल्या आहेत. त्याचा वापर करुन माझा राजीनामा आपल्याकडे देऊ शकण्यांची शक्यता नाकारता येत नाही. सदरील पदाचा राजीनामा मी स्वतः आपणाकडे देऊन त्याची रितसर पोच घेणे आवश्यक आहे तदनंतरच माझा राजीनामा ग्राहय धरण्यात येऊ शकतो.
असे निवेदन नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांना दिले असुन हेच निवेदन माहितीस्तव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

उपनगराध्यक्ष यांनी निवेदन प्रशासनाला दिले असुन राष्ट्रवादीतील वाद चक्क चव्हाट्यावर आला असून आता कोणी को-या कागदावर सह्या घेतल्या आणि कोण उपनगराध्यक्ष यांचा राजीनामा दाखल करणार आहे. याचा पुढील काळात उलगडा होणार आहे.

मागील काही महिन्यापासून गटबाजी वाढल्यामुळे राष्ट्रवादीची शहरातील प्रतिमा मलीन होत असुन आता उपनगराध्यक्ष मुंदडा यांनी खुर्ची वाचवण्यासाठी नवीन शक्कल लढवली असुन निवडणुकीच्या काळात को-या कागदावर सह्या झालेल्या असुन याचा वापर राजीनाम्या करीता होणार असल्याची शक्यता निवेदन वर्तावली आहे. त्यामुळे शहरात चर्चा चा विषय जोरदार चर्चा चालू आहे.

COMMENTS