शरद पवारांनी माझा राजकीय पूनर्जन्म केला, ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केल्या भावना!

शरद पवारांनी माझा राजकीय पूनर्जन्म केला, ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केल्या भावना!

पुणे – पवार साहेबांनी कालच फोन करून तुम्ही मंत्री होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवारांनी माझा राजकीय पूनर्जन्म केला असल्याची भावना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे सरकार किमान समान कार्यकमानुसारच चालेल. तशा स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आघाडीमध्ये जे खातं मिळेल, ते सांभाळणार असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात आयोजित फुले समता पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुक्ता टिळक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित आहेत.

दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यही महात्मा फुले यांच्याच विचारांचे आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आज राज्याची धुरा हाती घेत आहेत, याचा आनंद होत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कामही सत्यशोधक चळवळीचा वारसा चालवणारेच आहे. समता परिषदेलाही त्यांची नेहमीच साथ लाभली, म्हणून आजही मी त्यांच्यासोबत असल्याचं यावेळी भुजबळ म्हणाले.

COMMENTS