राष्ट्रवादीला धक्का, माथाडी नेत्याचा राजीनामा, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

राष्ट्रवादीला धक्का, माथाडी नेत्याचा राजीनामा, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून माथाडी नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा आणि लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी आपण सर्वपदांचा राजीनाम देत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान नरेंद्र पाटील यांना भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यपदाचा आणि लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते लवकरच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS