राष्ट्रवादीला धक्का, पवारांनी जाहीर केलेला उमेदवार आज करणार भाजपात प्रवेश !

राष्ट्रवादीला धक्का, पवारांनी जाहीर केलेला उमेदवार आज करणार भाजपात प्रवेश !

बीड – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचा दौरा केला. बीड जिल्ह्यात गेले असता पवारांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतुन विजयसिंह पंडित आणि केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु आता या पाच उमेदवारांपैकी केजमधून उमेदवारी देण्यात आलेल्या नमिता मुंदडा या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमिता मुंदडा या आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नमिता मुंदडा यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टरवरुन पक्षाचे चिन्ह आणि पवारांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. केजच्या विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनीही उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. अखेर सोमवारी सकाळी नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेश आणि उमेदवारीला भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. आज त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

 

शहिद भगत सिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.I pay my tributes to the personification of valour and sacrifice, Shri Bhagat Singh on his jayanthi, today.

Posted by Namita Akshay Mundada on Saturday, September 28, 2019

COMMENTS