राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई – राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक ज्येष्ठ नेता शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात असून नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भास्कर जाधव शिवसेनेत जाणार असल्याचं दिसत आहे.

जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार टीका केली होती. ‘मी याआधीच पक्षाकडे मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. पण पक्षाने तेव्हा माझं ऐकलं नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का असणार असल्याचं दिसत आहे.

परंतु शिवसेना प्रवेशाबाबतचं वृत्त खोटं असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार का नाही ते आगामी काळच सांगणार आहे.

बार्शीचे आमदार दिलीप सोपलही शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल
यांनी आज राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा सोपल यांनी कार्यकर्त्यांसमोर केली आहे. येत्या 28 ऑगस्टला दुपारी 1 वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोपल यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS