राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश ?

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखी एक मोठा धक्का बसणार असून पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील गेली 30 वर्षे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आणि त्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आमदार दिलीप सोपल हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उद्या सोपल हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोपल यांच्या प्रवेशाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. सोपल यांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या ‘झाला रे….जय महाराष्ट्र… वाघ मातोश्रीवर”, “कसलं वादळ भगवं वादळ”, “10 तारीख… जय महाराष्ट्र…” अश्या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री दिलीप सोपल यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेना प्रवेश आणि विधानसभेचे तिकीट यासह अनेक बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती असून त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोपल शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. आता त्यांच्या प्रवेशाने शनिवारी याला पूर्णविराम मिळणार आहे.

COMMENTS