राष्ट्रवादीचा आणखी एक नेता बंडखोरीच्या तयारीत,  विद्यमान आमदाराविरोधात लढवणार  निवडणूक?

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता बंडखोरीच्या तयारीत, विद्यमान आमदाराविरोधात लढवणार निवडणूक?

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बांदल यांनी आंबेगावमधल्या जारकरवाडीत शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना हजेरी लावली. एवढच नाही तर त्यांनी या कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तोंडभरून कौतुकही केलं. त्यामुळे वळसे पाटलांविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.

दरम्यान मंगलदास बांदल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचा सामना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत होणार आहे. मंगलदास बांदल यांचाही या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे याचा फटका वळसे पाटील यांनी बसू शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे मंगलदास बांदल यांच्या आगामी भू्मिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS