राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार तर चिंचवड विधानसभेसाठी ‘यांचं’ नाव निश्चित ?

राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार तर चिंचवड विधानसभेसाठी ‘यांचं’ नाव निश्चित ?

पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा धडाका लावला आहे. पार्थ पवार यांनी आज पिंपरी चिंचवडकारांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी गणपतीचा अभिषेक आणि आरती केली. त्यामुळे मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन पार्थ पवारांनी मावळ प्रचाराचा नारळ तर फोडला नाही ना? अशी चर्चा आता मावळमध्ये सुरू झाली आहे.

या दौ-यादरम्यान पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. पार्थ पवार आणि नाना काटे यांच्या या भेटीमुळे आगामी निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान 2014मध्ये मोदी लाट असतानाही विधानसभा निवडणुकीत नाना काटे यांनी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठीही काटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS