शरद पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब, माढ्यातून लढवणार निवडणूक!

शरद पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब, माढ्यातून लढवणार निवडणूक!

मुंबई – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे वरीष्ठ नेते, माढाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माढ्यातील पक्षाचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान माढा मतदारसंघातून शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.  त्यामुळे आजच्या बैठकीत पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच पवार यांच्या उमेदवारीमुळे पक्षातंर्गत नाराजी राहु नये यासाठी राष्ट्रवादीकडून धडपड सुरु असून आजच्या या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.

मुंबई – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार आहेत. आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे वरीष्ठ नेते, माढाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माढ्यातील पक्षाचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

दरम्यान माढा मतदारसंघातून शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्याची गेली काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. नाराज नेते आणि समर्थक यांच्यात समेट घडवून एकदिलाने निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात बैठकीत  चर्चा झाली.बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी नाराज नसल्याचं म्हटलं आहे. मी स्वत: शरद पवार यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS