राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीला सुरुवात, प्रमुख नेत्यांची उपस्थिती !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीला सुरुवात, प्रमुख नेत्यांची उपस्थिती !

मुंबई – दुष्काळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीत दुष्काळाबरोबरच लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, लोकसभा निवडणूक लढवलेले उमेदवार उपस्थित आहेत.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच हालचाली सुरु केल्या असल्याचं दिसत आहे. या बैठकीत दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्यातील फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी केली जाणार आहे. प्रत्येक नेत्याला त्यांच्या भागातील दुष्काळाची माहिती घेण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

तसंच दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही विचारमंथन करण्यात येणार आहे. दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न या मुद्यावरुन सरकारला लक्ष्य करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS