बाई बाई राष्ट्रवादीचं हे घड्याळ मोलाचं…, ऐका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रचार गीत !

बाई बाई राष्ट्रवादीचं हे घड्याळ मोलाचं…, ऐका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रचार गीत !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नवीन प्रचार गीत तयार करण्यात आलं आहे. बाई बाई राष्ट्रवादीचं हे घड्याळ मोलाचं अशी या.गीताचे बोल असून राज्यभरात हे गाण चांगलच गाजत असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा आजपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिनांक ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत शरद पवार झंझावाती दौरा करणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११. ३० वाजता, पारोळा सायंकाळी ५ वाजता, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे सकाळी ११. ३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा – कारंजा दुपारी ४ वाजता, दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी १०. ३० वाजता, बुटीबोरी- हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.

COMMENTS