त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार  प्रकाश सोळंकेंनी घेतला राजीनामा न देण्याचा निर्णय!

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतला राजीनामा न देण्याचा निर्णय!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. ते आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या बैठीनंतर सोळंके यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

दरम्यान प्रसारमाध्यमांतून नाराजीची चर्चा समोर आली होती. त्यामुळे आज त्यांना मुंबईला बोलावण्यात आलं. आमची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादी पक्ष एका कुटुंबाप्रमाणे आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा मान ठेवणं, त्याला काम करण्याची संधी हे पवार साहेबांचं धोरण आहे. आम्ही त्यांच्याशी बोललो. स्वत: शरद पवारही बोलले. त्यातून प्रकाश दादांचं समाधान झालं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS