विरोधकही उल्लेख करणार नाहीत असा एकनाथ खडसेंकडून सरकारचा उल्लेख, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट !

विरोधकही उल्लेख करणार नाहीत असा एकनाथ खडसेंकडून सरकारचा उल्लेख, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट !

जळगाव – चार वर्षांपूर्वी एक वादळ आलं आणि असे लोक राज्यात निवडून आले ज्यांना लोकांनी कधी पाहिलेही नव्हते. जोपर्यंत भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांनी केली आहे. चोपडा येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकही सरकारविरोधात बोलणार नाही असा उल्लेख एकनाथ खडसे सरकारविरोधात करतात असा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे.

दरम्यान त्यावेळी बोलत असताना त्यांनी नियती सर्वांसोबत न्याय करते म्हणून नाथाभाऊचे मंत्रीपद एका वर्षाच्या आत गेले. या सरकारचा कारभार कसा चालू आहे हे एकनाथ खडसे चांगल्या पद्धतीने सांगतात. विरोधकही या निष्क्रिय सरकारचा उल्लेख करणार नाही असा उल्लेख खडसे या सरकारचा करतात असा गौप्यस्फोट  ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांनी केला असून एकनाथ खडसे यांनी सरकारबद्दल नेमका काय उल्लेख केला असेल याबाबत तर्कवितर्क सध्या राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत.

COMMENTS