शरद पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटलांपुढे मोठे आव्हान !

शरद पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटलांपुढे मोठे आव्हान !

उस्मानाबाद – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. गेल्या चाळीस वर्षात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून काम केलं. मात्र आता शरद पवारांची साथ सोडून आमदार पाटील भाजपमध्ये गेले त्यानंतर पहिल्यांदाच खासदार पवार जिल्ह्यामध्ये आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमधून पवारांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे आमदार पाटील यांच्यासमोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. पवार यांच्या दौर्‍यामुळे राष्ट्रवादीची स्थिती मजबूत होईल का? आमदार पाटील यांच्या राजकीय वाटचालीवर याचा काय परिणाम होईल? आणि आघाडीला काय फायदा होईल याचा थोडक्यात आढावा.

आमदार पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य तसेच नगरसेवक यांच्यासह मोठ्या संख्येने नेते गेले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीची पूर्ण वाताहत झाल्याचे चित्र होतं. मात्र पवारांच्या सभेने पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी पहिला मिळाले. ज्या मंगल कार्यालयामध्ये सभा झाली ते कार्यालय खचाखच भरले होते.

 

शिवाय त्या कार्यालयाच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पवारांच्या जयघोशाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. अनेक कार्यकर्त्यांना ऐकायला येत नव्हते. तरीही इकडून तिकडून जाऊन ऐकण्याचा आणि त्यांची सभा पाहण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत होते. आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये 80 टक्के तरुण कार्यकर्त्यांचा भरणा होता. त्यांचा जोशही तेंव्हाढच होता. त्यामुळे नेते जरी पक्षाला सोडून जात असले तरी कार्यकर्ते पवारांच्या सोबत असल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले.

मागील विधानसभेचा विचार करता आमदार पाटील यांना उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य नव्हाते. लोकसभा निवडणुकीत राजेनिंबाळकर यांना सात हजाराची आघाडी मिळाली होती. आगामी निवडणुकीत मतदार आमदार पाटील यांच्यासोबत किती जाणार यावर कालच्या पवार यांच्या सभेला प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राष्ट्रवादीचा 70 टक्के मतदार आमदार पाटील यांच्यासोबत गेली नाही तर त्यांना पुढील काळात मोठे आव्हान असणार आहे.

या मतदारसंघात भाजपची मूळची ताकद कमी आहे. तिकडे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्याही परिस्थितीत त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादीही पूर्णपणे सोबत नाही. तर तीसरीकडे भाजपतील जुने पुढारी काय करतात याचा नेम नाही. त्यामुळे तिन्ही बाजूंनी कोंडी झाल्यासारखी अवस्था आमदार पाटील यांची झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुर्ण ताकत पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये गेली असल्याचे बोलले जात होतो. मात्र प्रत्यक्षात ही शक्यता दिसत नाही. खासदार पवार यांना युवापिढीचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याने विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघ आमदार पाटील यांच्यासाठी सोपा नसल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS